नाना पाटेकर यांची भेट आणि प्रश्न उत्तरश्रीराम क्षीरसागर

आयुष्याच्या प्रतेक वळनावर संघर्ष करून दुस—याला सरळ रस्ता दाखवनारा आभिनेता म्हणजे नाना पाटेकर आपल्या आयुष्यांच्या प्रतेक घडया आगदी सहजपने उलगडुन सांगनारे नाना यांची भेट म्हणजे आश्चर्यच! उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापुर तालुक्यामध्ये आनदुर या गावी नाना पाटेकर एका कार्यक्रमाला आले आसता पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन नाना ची भेट आणि दिलखुलास चर्चा झाली. जवळपास आर्धा तास चाललेल्या या चर्चेमध्ये नानाच्या सोबत अभिनेता मंकरद आनासपुरे ही होते. त्यांनी नाम फाउडीशेन च्या माध्यमातुन हाती घेतलेल काम एक संगळयासाठी आदर्शच म्हणावा लागेल. मराठवाडयातील दुष्काळा सेाबत दोन हात करून जगण्याचा मार्ग शेतक—यांना नाना आगदी कळकळीन सागतो.पण शेतकरी तरी काय करणार? संकटचं ऐवडी आहेत की त्यांनाही मार्ग दिसत नाही हे देखील नाना ला कळत. आपल्या चित्रपट व्यावसायामध्ये कुणासमोर ही न झुकलेला नाना शेतक—यांच्या माता,भगिनी समोर आगदी आदराने झुकतो. याच नानाच्या स्वभवाचा सगळयांना हेवा वाटतो.चित्रपटामधून कुठल्याही विषयी सडेतोड मत माडून बिनधास्त पने मारणारा नाना वास्तव काही वेगळाच आहे.आपल्या मराठमोळया शैलित नाना ने पत्रकारांच्या प्रश्नांना आगदी मनसोक्त उत्तर दिली.आजपर्यत नानाचे चित्रपट बघुन खुश होणारे आम्ही प्रतेक्षात नाना ला भेटुन समाधान वाटले.