शेतक—यांची मजबुरी अन शिक्षकांची सावकारीश्रीराम क्षीरसागर

निसर्गाने शेतक—यांच्या गळयाला फास लावला आणि शिक्षकांची सावकारी उदयास आली. मराठवाडयामध्ये या तिन वर्षामध्ये हजारोंच्या संख्याने शेतक—यांनी आपले आयुष्य संपवले तर काही शेतकरी सावकारांचे ओजे डोक्यावर घेवुन जगताना दिसतात. त्यामुळे शिक्षकी पेशात असलेले सावकार आपल्या राक्षशि वृत्तीचे दर्शन ​आगदी निर्लज पध्दतिने दाखवत आहेत.शिक्षकावर सरकार मेहरबान झाल्याने शिक्षकांच्या पगारीमध्ये अमाप वाढ झाली आहे.घरामध्ये नवरा— बायको दोघेंही शिक्षक असल्यावर महीण्याकाठी एक लाख रूपये घरामध्ये येतात. गरजे पेक्षा जास्त येणा—या पैशामुळे शिक्षकांची सावकारी चागलीच फोफावली आहे. एकेकाळी सगळयांच्या अदरस्थानी असलेला शिक्षक आज सावकारीच दुकान चालवताना दिसत आहे आपली सदबुध्दी गहान ठेवून आडचनीत आलेल्या शेतक—यांचा तो फायदा घेताना दिसतो. शेतीवर आधारीत असलेल शेतक—यांच जिवन दिवसेंदिवस अतिशय हालाकीच बनत चालल आहे.शेतक—यांसमोर अडचनी आनेक पर्याय म़़ात्र एकही उरला नाही. यामुळेच आत्महात्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगामध्ये शिक्षक मालामाल झाले आहेत. बुध्दी तेवडीच पण पगार मात्र वर्षाला वाढत चालल्यामुळे सावकारी,जमीन खरेदी विक्री आसे व्यावसाय शिक्षकांने चालु केले आहेत. शिक्षकापेक्षा जास्त स्किल असलेले लोक भरपुर आहेत तेही कमी पैशामध्ये जास्त काम करताना दिसतात आशा लोकांचा विचार सरकार कधी करणार महाराष्ट्रात संगळीकडे दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची भुमीका मांडली आहे. शिक्षकांच्या वाढत्या पगारीमुळे आर्थिक चक्र बिगडत चालले आहे आणि आर्थिकद्रष्टया सामाजिक समतोल दिसत नाही यासाठी शिक्षकांची सावकारी मोडीत काढने गरजेचे आहे.