लातुर ला मिळणार रेल्वे ने पाणी ... रेल्वे मंंत्री

रिपोर्टर..--- पाण्याचं दुर्भिष्य लक्षात घेऊन लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी याबाबतची घोषणा ट्विटरवरून केली आहे. राज्य सरकारनं याबाबत मागणी केली होती.  लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा विस्तृत तपशील रेल्वेमंत्रालय जाहीर करणार असून त्यासाठी रेल्वे तयारी करत असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातलं सर्वात जास्त पाणी टंचाईग्रस्त मासुर्डी या गावाला राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांनी दत्तक घेतलं आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईनं होरपळनार्‍या लातूर जिल्ह्यातल्या 37 गावांनादेखील खासदार काकडे यांनी 50 लाखांचा निधी देण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता या गावांना दिलासा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातली पाणी टंचाई लक्ष्यात घेता राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांनी औसा तालुक्यातलं सर्वाधिक टंचाई ग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या तीन वर्षांपासून मासुर्डी या गावाची तहान टँकरवरच भागतेय. या गावात वीज आणि पाणी टंचाईनं कहर केला आहे. त्यामुळ खासदार काकडे यांनी हे गावच दत्तक घेतलंय आणि येत्या दोन वर्षात या गावाचा कायापालट करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.