पाणी बचतीचा जागर करीत जलजागृती सप्ताहाची सांगता

उस्मानाबाद : पाणी वापराबाबत जिल्हाभर जागृती करीत आणि विविध माध्यमातून पाणी बचतीचा संदेश देत जागतिक जलदिनी जलजागृती सप्ताहाची सांगता झाली.

रांगोळी स्पर्धा, जलदौडीचे आयोजन, पथनाट्य आणि कलापथकाच्या माध्यमातून ही जागृती करण्यात येऊन पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. सप्ताहाचा समारोप अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री व्ही. एस. बुरुडे, एम.आर. आवलगावकर, बी.आर. शिंगाडे आदी उपस्थित होते.

यावेळी जलदौडीमध्ये सहभाग नोंदवून पहिल्या तीन क्रमांकाने येणाऱ्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे श्री. पाठक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी पाटबंधारे मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पानगावचा गणपत या प्रयोगाचे सादरीकरण केले.

सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता शेषाद्री डांगे यांनी केले तर आभार सहायक अभियंता अश्विनी पिंपळे यांनी मानले. यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.