हा अर्थसंकल्प शेतक—यांसाठी.... मुनगंटीवार

MAHABUDGET banner123:  रिपोर्टर...... हा अर्थसंकल्प बळीराजाला समर्पित आहे’ असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा महाअर्थसंकल्प सादर केला. शेतकर्‍यांसाठी 25 हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली. शेतकर्‍यांना स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी मदत आहे. सक्षम शेतकरी ‘मेक इन इंडिया’चा पाया असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे वॅटमध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आलीये. त्यामुळे सर्वच वस्तू महागणार आहे.
दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किंमतीमध्येही वाढ करण्यात आलीये. तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी बेघरांना घरं, स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींना घरं देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केलीये. अंगणवाडी सेविकांसाठी 2 लाख रुपयांपर्यतचा जीवन वीमा आणि 2 लाख अपघात विमा अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. अंगणवाडी सेविकांसाठीचा हप्ता सरकार भरणार आहे, त्याचबरोबर 10000 अंगणवाड्या आदर्श करण्यासाठी 100 कोटींचा निधी सरकारनं ठेवला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ करण्यासाठी 1000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
 घोषणा
- यंदाचा अर्थसंकल्प शेतकर्‍यांना समर्पित शेतकर्‍यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद
- 2016-17 हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणूनही साजरा करणार 
- सिंचनासाठी पुढच्या वर्षासाठी 7 हजार 850 कोटी, 1 लाख 68 हजार हेक्टर सिचंन क्षेत्राला फायदा होणार
- जलयुक्त शिवार योजनेला यावर्षीसाठी 1 हजार कोटी
- 50 हजार शेततळी बांधण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
- साखरेची निर्यात करणार्‍या कारखान्यांना यापुढे ऊस खरेदी कर माफ करणार
- साखर निर्यातीला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा
- मागासलेल्या मराठावाडा आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी 1 हजार कोटींची विशेष तरतूद
ऐ- निराधार महिलांसाठी 332 कोटींची तरतूद
- तर महिलांसाच्या सुरक्षित प्रवासासाठी 300 तेजस्विनी बसेस सुरू करणार 
- भाकड गायींच्या संगोपनासाठी गोवर्धन गोवंश रक्षा योजना राबवणार
- संगोपन केंद्रांसाठी 18 कोटी 63 लाख रुपयांचा निधी देणार, एनजीओ मार्फत योजना राबवणार
- राज्यात 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार
- नगरपालिकांसाठीच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसाठी 1000 कोटी रुपये देणार 
- पुणेकराचं मेट्रोचं स्वप्न यावर्षीही दुरापास्त, पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी मिळून अवघ्या 180 कोटींचा तुटपुजा निधी मिळणार
- वॅटमध्ये अर्धा टक्क्यांची वाढ झाल्याने बहुतांश वस्तू महागणार, खरेदी करणं आणि हॉटेलमध्ये खाणं होणार आणखी महाग
- निराधार महिलांसाठी 332 कोटींची तरतूद
- महिलांसाच्या सुरक्षित प्रवासासाठी 300 तेजस्विनी बसेस सुरू करणार 
- अंगणवाडी सेविकांसाठी 2 लाखांचा जीवन विमा आणि अपघात विमा मिळणार
- सरकारच भरणार विम्याचे हप्ते,आदर्श अंगणवाडी योजनाही राबवणार 
- बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीसाठी 170 कोटी
- महाराष्ट्राबाहेरील शिव स्मारकांना 5 कोटी
- आबांच्या स्मारकासाठी 5 कोटींचा निधी दिला