२३ वर्षीय आईने आपल्या 3 वर्षीय चिमुकल्यासह गळफास लावून केली आत्महत्या

नंदुरबार :-जितेंद्र बैसाणे  शहादा तालुक्यातील सुलतानपूर गावात २३ वर्षीय आईने आपल्या  3 वर्षीय चिमुकल्यासह गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे
सुलतानपूर गावातील मालाबाई ठाकरे या विवाहितेने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने आपल्या तीन वर्षीय मुलगा गौरव ठाकरे याच्यासह घराच्या छताला दोरीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे हि घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघड झाली घटना स्थळी म्हसावद पोलीस दाखल झाले असून घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत
मालाबाईगोरख ठाकरे गौरव