केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग

नंदुरबार रिपोर्टर..  :- गुजरात आणि महाराष्ट्र च्या सीमावर्ती भागातील नवापूर तालुक्यातील सुरत नागपूर महामार्गावरील  आदिमाता  हॉटेलवर केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागून ट्रक जळूनखाक झाला आहे तर आगीत हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
आज सकाळी पाच वाजेचा सुमारास हॉटेल उभे असलेल्या केमिकल्स भरलेला ट्रक उभा होता त्याला आचानक आग लागली गाडीत केमिकल्स असल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले सुदैवाने पाहटेची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही
या  परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या मोठ्या प्रमाणत केमिकल चोरी होत आसते कारण गुजरात मधील कारखान्या मधून निर्माण झालेले केमिकल याच मार्गाने जात आसते या गोष्टीची माहिती पोलिसांना असून हि    गुजरात कि महाराष्ट्राचा हद्दीत या वादावरून केमिकल्स माफियावर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे