गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियायी क्रिडा स्पर्धेत उस्मानाबादच्या सारीका काळेने खो - खो संघाचे नेतृत्व करुन सुवर्ण पदक मिळविले

https://f5check.rediff.com/bn/downloadajax.cgi/sarika_kale.jpg?login=shriramkshirsagar&session_id=5L28PK1KSK9gzoCR0JjCp3uQIsdgrl50&formname=download&folder=Inbox&file_name=1455356249.S.372258.20899.H.WXN1ZGhpciBwYXRpbADgpLDgpL7gpLfgpY3gpJ,gpY3gpLDgpYDgpK8g4KS44KWN4KSq4KSw4KWN4KSn4KU_.RU.rfs265,rfs265,845,491.f5-147-172.old&filetype=image/jpeg&els=e0a2e813b90d9870ffbaa6e0a8614eeaआसाम मधील गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियायी क्रिडा स्पर्धेत धाराशिव येथील सारीका सुधाकर काळे यांनी भारतीय खो - खो संघाचे नेतृत्व करुन सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात येणार आहे.
धाराशिव येथील सारीका सुधाकर  हिकाळेने दिनांक ५ पेâब्र्रुवारी २०१६ पासून आसाम मधील गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियायी क्रिडा स्पर्धेत भारतीय खो - खो संघाचे नेतृत्व केले होते. तसेच या स्पर्धेत या संघाने सुवर्णपदकही मिळविले आहे.
सारीका सुधाकर काळे ही येथील श्रीपतराव भोसले हायस्कुलची विद्यार्थीनी आहे. याच शाळेत सारीका काळे हिने खो- खो चे धडे घेतले आहेत. काळे हिने संपादन केलेल्या यशामुळे संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले आहे.
सारीका काळे हीने संपादन केलेल्या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक १५ पेâब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात सारीका काळे हीचा सत्कारही करण्यात येणार आहे. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, प्राचार्य एस. एस. पडवळ, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख, क्रिडा मार्गदर्शक प्रविण बागल, अभिजीत पाटील, विवेक कापसे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी या वेळी सर्व क्रिडाप्रेमी, नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.