.. पोलीस भरतीसाठी तयारी करणा—या दोन तरूनाचा मृत्यू

आज सकाळी सहाच्या सुमारास http://www.navabharat.com/wp-content/uploads/2011/12/Police-Recruit.jpgचार तरुण पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करत होते. त्यावेळी या चौघांना कंटेनरने उडविले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे देऊर गावावर शोककळा पसरली आहे.
रिपोर्टर- सातारा-लोणंद रस्त्यावर देऊरजवळ (ता. कोरेगाव) आज (गुरुवार) सकाळी पोलिस भरतीसाठी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या दोघांचा कंटेनरने उडविल्याने मृत्यू झाला.


अक्षय महेंद्र कदम (वय २२), गणेश दिलीप धुमाळ (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. तर, इंद्रजीत नारायण देशमुख (वय २२), मयुर मोहन कदम (वय २२) हे दोघेजण जखमी आहेत. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांचा प्रक्षुब्ध जमाव जमला आहे. परीस्थितीचे गांभीर्य ओळखून मोठा पोलिस फाटा अपघातस्थळी दाखल झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याशी ग्रामस्थांचा वाद झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.