राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल ..... .राजनाथ सिंग

http://www.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2016/02/rajnath-singh_13_0_0_0_0_0_1_0_1_0.jpg व्रत्त संस्था..: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर योग्य कडक कारवाई केली जाईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी भारतविरोधी आणि संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेला अफझल गुरूच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या होत्या. याशिवाय गुरुवारी दिल्ली प्रेस क्लबमध्येही पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली होती.
याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसंच देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माफ केलं जाणार नाही, अशा कडक शब्दात राजनाथ यांनी ‘जेएनयू’मध्ये घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकरणाचा निषेध व्यक्त केला. या देशातील कोणताही नागरिक भारत मातेचा अपमान सहन करू शकत नाही. राष्ट्रविरोधी वक्तव्या करणाऱयांवर कारवाई व्हायलाच हवी, असं मत इराणी यांनी व्यक्त केलं आहे.