स्वआधाराच्या बालगृहाचे उद््घाटन


कळंब तालुक्यातील पानगाव येथे स्वआधार संस्थेच्या वतीने उभारलेल्या बालगृहाचे उद््घाटन करताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे समवेत आ. राणाजगजितसिंह पाटी. बी.बी. ठोंबरे, शहाजी चव्हाण व अन्य. कळंब : मतिमंद बालकंही आपल्या समाजातीलच एक घटक आहेत. यांच्या उत्कर्षासाठी स्वंयसेवी संस्था झटत असल्या तरी अशा संस्थेसोबतच समाजातूनही या मूलांसाठी हात पूढे आले पाहिजेत, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
कळंब तालुक्यातील पानगाव येथील तुळजाई प्रतिष्ठानच्या वतीने उस्मानाबाद येथे स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह चालविण्यात येत आहे. या बालगृहाच्या नूतन इमारतीचे उदघाटन बागडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एनसाईचे अघ्यक्ष बी.बी.ठोंबरे तर आ. राणा जगजितसिंह पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, डॉ.अभय शहापूरकर, जिल्हा बँक संचालक विकास बारकुल, आळणीच्या सरपंच महानंदाताई चौघूले, डॉ.रमेश जाधवर, दलित मिञ लक्ष्मन वाघमारे,अतूल अजमेरा, संतोष ठोंबरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तूळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण, सुत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी तर आभार विलास वकिल यांनी मानले.