राज्यातील 66 सिंचन प्रकल्पांची नव्यानं चौकशी – चौकशी समिती स्थापन

रिपोर्टर----- राज्यातील 66 जलसिंचन प्रकल्पांची नव्या चौकशी होणार आहे. यामध्ये नाशिकमधील किकवी आणि अकोल्यातील कांचनपूरा लघू सिंचन प्रकल्पाची विषेश चौकशी होणार आहे.
अयिमीतता असल्याने हे सर्व प्रकल्प कोर्टाने रद्द केले होते. मात्र हे प्रकल्प सुरू होण्यापुर्वीच कंत्राटदारांना ऍडवान्स रक्कम देण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठाने एक जनहित याचिकेवर सुनावणी करतांना या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यासाठी बुधवारी सरकारने 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. 3 महिन्याच्या आत ही समिती आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करणार आहे.

- 66 प्रकल्पाचं कामच सुरू झालं नाही - मराठवाड्यातील 10 तर विदर्भातील 56 प्रकल्प-- काम सुर
होण्याअगोदरच कंत्राटदारांना ऍडव्हान्स- अकोल्यातील कांचनपुरा लघुप्रकल्प आणि -
नाशिकच्या किकवी प्रकल्पाची विशेष चौकशी     योग्य मंजुरी नसल्यामुळे सर्व प्रकल्प कोर्टानं केले रद्द