दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडय़ाच्या पाहणी दौर्‍यावर येत आहे.

दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाडयातील शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडय़ाच्या पाहणी दौर्‍यावर येत आहे.
केंद्रीय पथकाचा हा चार दिवसांचा दौरा आहे. यामध्ये पथकातील अधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकर्‍यांसोबत सवांद साधणार आहेत. त्याचबरोबर दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.