टोलमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या महिन्याभरात कोल्हापूर टोलमुक्त करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
30 नोव्हेंबरपूर्वी कोल्हापुरातले सर्व टोल बंद होणार, असल्याची माहिती पाटील यांनी दिली. येत्या 30 तारखेच्या आत नगर विकास विभाग यासंदर्भातली अधिसूचना जाहीर करेल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान टोलनाके बंद झाल्यानंतर आयआरबीला किती आणि कशी रक्कम द्यायची यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारच्या अधिसुचनेला न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी सर्व बाबी सरकार तपासून पाहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे .रिपोर्टर