इंद्राणी मुखर्जींचा आत्महत्येचा प्रयत्...


णावावरील औषधांच्या गोळ्यांचे तुरुंगातच अतिसेवन
इंद्राणी मुखर्जींचा आत्महत्येचा प्रयत्न?

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी शुक्रवारी तणावावरील औषधाच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने त्यांना जे. जे. हॉस्पिटलातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दुपारपासूनच बेशुद्धावस्थेत असलेल्या इंद्राणी यांची प्रकृती गंभीर आहे. स्वत:च्याच मुलीच्या हत्येच्या आरोपात कायद्याचा फास आवळल्या गेलेल्या इंद्राणी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुरुंगातच घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, तुरुंग प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.