उस्मानाबाद : चारचाकी वाहने चोरणार्या टोळीतील दोघांना दरोडा प्रतिबंधक
पथकाने जेरबंद केले. ही काररवाई गुरूवारी करण्यात आली. कारसह मोबाईल जप्त
करण्यात आला. अटकेतील दोघांना वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील हणुमंत डांगर यांची कार (क्र.एम.एच.२३- ई. ९५८५) तीन दरोडेखोरांनी ८ मार्च रोजी रात्री भाड्याने करून सोलापूरला जाण्यासाठी म्हणून आणली होती. वाशी तालुक्यातील नरसिंह साखर कारखान्याच्या परिसरात कार आल्यानंतर चालक हणुमंत डोंगर यांच्या डोळ्यात चटणी टाकून एक मोबाईल, रोख ६000 रूपयांसह कार घेवून पळ काढला होता. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. वाहन चोरीतील दरोडेखोरांच्या शोधार्थ दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली व त्यांचे सहकारी माळशिरज, अकलूज, टेंभुर्णी आदी सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या भागात फिरत असताना दरोन दरोडेखोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून आकलूज येथील देविदास सारगर व सचिन खुडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेली कार पुणे परिसरात असल्याचे सांगून चोरीचा मोबाईलही पोलिसांना दिला. पोलिसांनी त्यांना अटक करून वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाटे, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली, त्यांचे सहकारी भागवत झोंबाडे, वाहेद मुल्ला, सचिन कळसाईन, यासिन सय्यद, मनोज मोरे, काका शेंडगे, चालक नजू पठाण आदीनी केली. एकाचा शोध सुरू ■ वाहन चोरीच्या टोळीतील तिसरा दरोडेखोर अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या दरोडेखोरांकडून इतर वाहन चोरी प्रकरणातील माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. |