'एक दिवस मजुरासोबत'


उस्मानाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 'एक दिवस मजुरासोबत' या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे व त्यांच्या चमूने भाग घेतला.
या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरून प्रत्येक मंडळातील एका गावामध्ये जिल्हास्तरीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती. उस्मानाबाद तालुक्यातील लासोना गावी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी तेजेस चव्हाण, तहसीलदार सुभाष काकडे, गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोरे, तालुका कृषी अधिकारी डी. आर.जाधव आदींनी मजुरांना मार्गदर्शन केले. यावेळी मजुरांना आधारकार्ड, जॉबकार्ड, विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, विविध योजनांचे एकत्रीकरण करून त्याचा लाभ गरजु कुटुंबांना देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी गावात आरोग्य तपासणी शिबीर, पशुवैद्यकीय तपासणी शिबीर व आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालाजी विष्णू पवार या शेतकर्‍याच्या शेतावर सिंचन विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला