मुंबई, रिपोर्टर . भाजप आणि शिवसेना हे सत्तेला लागलेले मुंगळे आहे. त्यामुळे
कुणीही सत्ता सोडणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी
केली. तसंच पूर्वी काही लोक आत्मसन्मानाची भाषा करत होते पण आज तसं दिसत
नाही असा टोलाही शरद पवारांनी शिवसेनेला लगावला.त्ताधार्यांमध्ये कितीही वाद असला तर
सरकार टिकेल
राज्यातील दुष्काळी दौर्यानंतर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी
त्यांनी दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दुष्काळाची परिस्थिती
भीषण आहे. अपुरा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकर्यांच्या
आत्महत्यांची संख्या वाढलेली दिसते. पण, सरकारने यावर अजूनही कोणतीही
उपाययोजना केली नाही. सरकारचे अनेक निर्णय कागदावरच असून अनेक निर्णयांची
अद्याप अंमलबजावणीही नाही. एवढंच काय तर राज्य सरकारतर्फे एकाही
शेतकर्याच्या मुलाचं शैक्षणिक शुल्क भरलं गेलं नाही अशी खंत शरद पवारांनी
व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीबद्दल राष्ट्रवादीने अहवाल तयार केला असून
तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे असं पवारांनी सांगितलं. यानंतर
पवारांनी आपला मोर्चा युती सरकारच्या वादाकडे वळवला.