यापूर्वीकाही प्रवाशांकडे एसटी महामंडळाच्या प्रवास
सवलतीचे बोगस पासेस आढळून आले होते.त्यानंतर आता हा प्रकार उघड झाल्यामुळे
ग्रामीण भागातील अशिक्षित व गरजुंना अशी प्रमाणपत्रे मिळवून देणारे रॅकेट
तालुक्यात कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होवू लागली आहे. फाज्ैादार
कारवाईहोणार बोगस प्रमाणपत्र असणार्या काही व्यक्तींशी तहसील
कार्यालयाने संपर्कसाधला असता त्या स्वत:ही या प्रकाराबाबत अनभिज्ञ
असल्याचे समजते.यामुळे आगामी आठवड्यात संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवून
बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.त्यांचा जबाब घेऊन दोषींवर फौजदारी
कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार प्रवीण लटके यांनी
सांगितले. ६२६प्रस्तावांना मंजुरी
शुक्रवारी कळंब तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार प्रवीण लटके, नायब तहसीलदार बी.जी.जोगदंड, अव्वल कारकून एम,वाय,केकान यांच्या उपस्थितीत 'संगायो'ची बैठक पार पडली.यावेळी समितीसमोर इंदिरा गांधी निराधार योजनेचे १४0, श्रावणबाळ योजनेचे ४५0 तर संजय गांधी योजनेचे २५0 असे एकूण ८४0प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.यातील बनावटगिरी निदर्शनास आलेले २१४प्रस्ताव नामंजूर करून उर्वरित ६२६प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. कळंब : शासनाच्या विविध योजनांचा लाभ उचलण्यासाठी वयोवृध्दांची फसवणूक करीत वयाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी झालेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत असे २१४ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.पुढील आठवड्यात यासंदर्भाने संबंधितांचे जबाब नोंदवून यापुढील कायदेशीर कारवाईकेली जाणार असल्याचे प्रभारी तहसीलदार प्रवीण लटके यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजनांतर्गत अनुदान वाटप केले जाते.यासाठी तलाठय़ांमार्फत संबंधित व्यक्ती आपला प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करतात.या ठिकाणी प्रस्तावांची छाननी होवून पात्र प्रस्ताव तालुकास्तरीय समितीपुढे ठेवले जातात.तेथे मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना दरमहा वेतन दिले जाते.कळंब तहसील कार्यालयातील शासन नियुक्त समिती नोव्हेंबर २0१४ मध्ये बरखास्त झाल्यानंतर अर्ज मंजुरीसाठी आजवर एकही बैठक झाली नव्हती.प्रभारी तहसीलदार प्रवीण लटके यांनी प्रलंबित अर्जांची संख्या सातशेच्या आसपास गेल्याने तातडीने बैठक घेऊन प्रस्ताव निकाली काढण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दाखल झालेल्या प्रस्तावांची तपासणी सुरूअसताना काही प्रस्तावातील वैद्यकीय दाखल्याच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली.त्यामुळे त्यांनी सदर २१४प्रमाणपत्र ज्यांनी 'इश्यू' केले, त्यांना पडताळणी करण्याबाबत सूचविले.जिल्हा रुग्णालयाने सदर प्रमाणपत्रांची तपासणी करून ती आपल्या कार्यालयामार्फत दिलेली नाहीत.त्यावरील सही, शिक्काही बनावट असल्याचे कळविले.त्यावरून ठकगिरीचा हा प्रकार समोर आला.यातील अधिकांश प्रस्ताव हे शिराढोण परिसरातील आहेत |