अध्यक्षपदासाठी राजेनिंबाळकर यांची वर्णी निश्‍चित

पालिकेत काँग्रेसचे संख्याबळ अवघे पाच इतके आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. शिवसेना-भाजपाचेही संख्याबळ पाच इतके असून, शिवसेनेकडून प्रेमा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत. छाननीअंती तीनही अर्ज वैध ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उस्मानाबाद : सुनील काकडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरूवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत होती. त्यानुसार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेते मकरंद राजेनिंबाळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर शिवसेनेकडून प्रेमा पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता राजेनिंबाळकर यांची वर्णी निश्‍चित मानली जात आहे.
पालिकेचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे.त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी होती. परंतु, पक्षo्रेष्ठींनी सुनील काकडे यांना झुकते माप देत त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. पक्षांतर्गत चर्चेनुसार त्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु, ते या पदावर पाच ते सहा महिने कार्यरत होते. अखेर मागील आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांकडे त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर प्रशासनाकडून नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत होती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची संख्या अर्धा डझनपेक्षाही जास्त होती. यामध्येही ज्येष्ठ सदस्य संपत डोके आणि गटनेते नंदू राजेनिंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेनिंबाळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.
दरम्यान, १0 मार्च रोजी दुपारी चार वाजेपर्यंत संबंधितांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर ११ मार्च रोजी नगराध्यक्षांची निवड होणार आहे.