शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने धाराशिव शहर व पुर्ण जिल्ह्यात उत्साही वातावरणात
जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८५ वी जयंती आज शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी आठ वाजता शिवाजी चौकात असणाNया छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास शिवसेना जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपतीचा जयजयकार करुन हा परिसर दणाणून सोडला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या दुग्धाभिषेक कार्यक्रमानंतर येथील शिवाजी चौकातच शिवछत्रपतीच्या सिंहासनारुढ असणाNया मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, नगरसेवक सोमनाथ गुरव, युवा सेना उपजिल्हाधिकारी अक्षय ढोबळे, बाळासाहेब देशमुख, बापू साळुंके, लिंबराज डुकरे, विश्वजीत देशमुख, प्रणिल रणखांब यांच्यासह शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे आदी पदाधिकाNयासह शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नुकताच पार पडलेला शिवजयंती उत्सव अतिषय सुरेख पध्दतीने व विविध उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी चौकातील मुर्ती प्रतिष्ठापणेनंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्नालयातील रुग्नांना मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाहू महाराज, तालुकाप्रमुख सर्वश्री मोहन पनुरे, राजअहमद पठाण, अनिल शेंडगे, रामलिंग आवाड यांच्यासह भगतसिंह गहीरवार, कमलाकर दाणे आदिसह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
या फळवाटप कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या वतीने भगवे ध्वज लावून शहरातून भव्य अशी मोटारसायकल व रीक्षा रॅली काढण्यात आली. डोक्याला भगवे पेâटे, गाडीवर भगवा झेंडा व मुखाने छत्रपतीचा जयजयकार करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भव्य अशी भगवी रॅली शिवाजी चौकातून निघून देशपांडे स्टँड, इंगळे गल्ली, नेहरु चौक, काळा मारुती चौक, बार्शी नाका, भोसले हायस्वूâलच्या प्रांगणात आले व त्याठिकाणी या भगव्या महारॅलीचे विसर्जन करण्यात आले.
विविध ठिकाणी शिवजयंती साजरी
शिवसेनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक चौकात भगव्याच रंगाचा मंडप टावूâन त्या मंडपामध्ये छत्रपती प्रतिमा, मुर्तीचे पुजन करुन कार्यकत्र्यांनी ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सतत होणारी नापिकी व जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या दिवाळखोरीमुळे या जिल्ह्यातील शेतकNयांचे वंâबरडे मोडले या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ९५ शेतकNयांनी आत्महत्या केल्या आहेत. घरातील कत्र्या पुरुषाच्या आत्महत्येमुळे या कुटूंबियास मुलाचे शिक्षण आणि उदरर्निवाहाची समस्या भेडसावतात. अनेक जाती, धर्मांना शासन आरक्षण देते, मात्र शेतकNयांचा कोणीही वाली नाही. तेव्हा कोणतीही जात पात न मानता शेतकरी हीच जात समाजून शेतकNयांना आरक्षण देण्यासंदर्भात आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून जेणेकरुन त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग यांनी केले.
धाराशिव जिल्ह्यातील आत्महत्या वेâलेल्या शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शिक्षणासाठी आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा शिवसेनेच्या वतीने दत्तक घेण्यात आले. भोसले हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गौरीष शानभाग बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाहू महाराज, तालुकाप्रमुख सर्वश्री मोहन पनुरे, राजअहमद पठाण, अनिल शेंडगे, गौतम लटके, रामलिंग आवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आज ४५ विद्याथ्र्यांची नोंदणी करुन त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. तसेच या विद्याथ्र्यांचा रहाणे तसेच जेवणाचा खर्चही शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना गौरीष शानभाग यांनी सदर उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांचे जाहिर कौतूक केले. ते म्हणाले की, शिवसेना सत्तेत असताणा सुध्दा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या शेतकNयांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबीयास आर्थिक मदत करुन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. एवढेच नाही तर त्यांच्या दुखाःत सहभागी होणारा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हाप्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख पाटील यांनी गेल्या वर्षी दुष्काळामध्ये शेतकNयांच्या जनावरांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी पाण्याच्या १४०० हौदाचे मोफत वितरण केले. आणि आज निराधार झालेल्या शेतकNयांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेवून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा अतिशय चांगला उपक्रम पाटील यांनी राबविल्याबद्दल शानभाग यांनी त्यांचे जाहिर कौतूक केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने शेतकNयांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. शेतकNयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जी जनजागरण दिंडी काढण्यात आली. त्या दिंडीमुळे शेतकNयांच्या व्यथा समजल्या, त्यांच्या अडचणी लक्षात आल्या आणि त्या मुळे शेतकNयांच्या निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचा सांगितले. यापुढील काळात ही शेतकNयांच्या हितासाठी कायमस्वरुपी कार्यरत राहू अशी ग्वाहीही दिली. याप्रसंगी सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाकर यांचेही मार्गदर्शन झाले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे यांच्यासह भगतसिंग गहीरवार, बाळसाहेब देशमुख, कमलाकर दाणे, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी अक्षय ढोबळे, नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील पिडीत शेतकरी व त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलाकर पाटील व आभार प्रदर्शन संदीप जगताप यांनी केले.

साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अनेक ठिकाणी सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.