मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानास प्रतिसाद --विविध शळेच्या विदयाथ्यॅाचा सहभाग

ग्रंथोत्सव उपक्रमात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानास प्रतिसाद
■ उस्मानाबाद :येथे आयोजित ग्रंथोत्सवात आयोजित प्रा.मिलिंद जोशी यांचय 'आचार्यअत्रे आणि पु.ल.देशपांडे :विनोदाची दोन शिखरे'या विषयावरील व्याख्यानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी प्रा.जोशी यांनी सांगितलेल्या आचार्यअत्रे आणि पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी किश्श्यांनी सभागृहातील प्रत्येकाला मनमुरादपणे हसविले. शाळेतील मुलांना शिक्षणाचा प्रसार आणि तणावमुक्त वातावरण राहण्यासाठी विनोदी लिखाण काळाची गरज असल्याचे प्रा.जोशी म्हणाले.आचार्यअत्रे व पु.ल.देशपांडे यांच्या विनोदाची शैली परस्पर विरोधी असली तरी मार्मिक होती.आचार्यअत्रेंच्या विनोदात रांगडेपणा तर पु.लं.च्या विनोदात शाब्दीक कोटी जास्त होती, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास जि.प.अध्यक्षअँड.धीरज पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, मसापचे सचिव बालाजी तांबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.व्याख्यानाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले तर बालाजी तांबे यांनी आभार मानले. उस्मानाबाद :जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने २ते ४मार्चया कालावधीत आयोजित ग्रंथोत्सव उपक्रमास जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिाद दिला.तीन दिवसांत तब्बल साडेतीन लाखाहून अधिक रूपयांची पुस्तक विक्री या प्रदर्शनातून झाली.समारोपानिमित्त ग्रंथोत्सवात सहभागी विक्रेते, प्रकाशक तसेच उपक्रमास सहकार्यकरणार्‍या यंत्रणा, व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून विविध ग्रंथ व पुस्तक विक्रेते तसेच प्रकाशकांचे २५स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते.यास साहित्यिक, कवी, ग्रंथालय चालक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य वाचकांसह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही मोठय़ा प्रमाणात भेट दिली.याच्या समारोप कार्यक्रमात मसापचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्षनितीन तावडे, अंनिसचे अध्यक्षएम.डी.देशमुख, जिल्हा ग्रंथागार अधिकारी गजानन कुरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते सहकार्यकरणार्‍या यंत्रणांचा गौरव करण्यात आला.या उपक्रमासाठी माहिती कार्यालयातील अशोक मळगे, शंकर शेळके, मकरंद नातू, आयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिध्देश्‍वर कोंपले, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशिकांत पवार, चित्रा घोडके आदींनी परिश्रम घेतले.समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र केसकर यांनी केले. कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते