
या कारखान्याच्या २० जागेसाठी तिन पॅनल रिंगणात होते. यात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या पॅनलच्या विरोधात काँग्रेसचे अॅड. व्यंकट गुंड व भाजपाचे संजय निंबाळकर यांचे पॅनल रिंगणात होते. रविवारी कारखान्याच्या एकूण ९ हजार ७५९ सभासदांपैकी ८ हजार ३१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८५.२० टक्के आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून तहसील कार्यालयातील महसुल भवनमध्ये मतमोजणीला सुरूवात होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ८० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका टेबलवर एक पर्यवेक्षक, २ सहाय्यक, एक शिपाई नेमले जाणार आहेत. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी दोन कर्मचारी राखीव ठेवण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिली.
डॉ. आंबेडकर कारखान्यासाठी यंदा चुरशीचे मतदान झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मयत सभासदांची संख्या मोठी आहे. अन्यथा मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली असती. या मतमोजणीनंतर अरविंद गोरे, अॅड. व्यंकट गुंड व संजय निंबाळकर
यांचे भवितव्य उघडकीस येणार आहे.