आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुले शिवसेना घेणार दत्तकउस्मानाबाद : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुले शिवसेना ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी दत्तक घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रथयात्रा काढली. यामध्ये त्यावेळी शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व आत्महत्या केलेल्या सर्व शेतकरी कुटूंबीयांची भेट घेवून त्याची माहिती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली होती. सर्व माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुले शिवसेनेच्या वतीने दत्तक घेण्यात येणार आहेत.
दि. ८ मार्च रोजी शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथी नुसार साजरी करण्यात येते. त्या दिवशी हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सुधीर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.