न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटी प्राध्यापक सेवेत कायम


उस्मानाबाद : शसाकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक) महाविद्यालयात हंगामी कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत कायम करण्यात आले आहे. या संदर्भातला शासन निर्णय १३ मार्च रोजी प्रसिद्ध झाला असून उस्मानाबाद व लातूर येथील ३० प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हंगामी व कंत्राटी स्वरुपात कार्यरत असणा-या प्राध्यापकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर व मुंबई खंडपीठात दोन वेगवेगळ्या रिट पिटीशन याचिका दाखल केल्या होत्या. तीन वर्षे सेवा झाल्याने सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०१५ रोजी राज्य सरकारला आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यासाठी ३ मार्च रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भातला शासन निर्णय १३ मार्च रोजी काढला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणा-या प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे. सेवेत कायम करण्यात आलेल्या प्राध्यापकामध्ये उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील ३० प्राध्यापक आहेत. आर.बी. खरात (लातूर), सिद्धारुढ अप्पाराव कबाडे (उस्मानाबाद), बी.एस. चापोलीकर (लातूर), श्रीमती एन.ए. पाटील (लातूर), श्रीमती जे.जे. माने (लातूर), श्रीमती एन.ए. पाटील (लातूर), श्रीमती एस.एन. बिडवे (लातूर), ए.जी. रामपूरे (लातूर), मधुबाला मुलगे (लातूर), महेंद्रकुमार गायकवाड (लातूर), जे.डी. गव्हाणे (लातूर), फुलचंद यमगर (उस्मानाबाद), श्रीमती ए.ए. बिराजदार (लातूर), राहुल तपकिरे (उस्मानाबाद), राणी फडतरे (उस्मानाबाद), पी.बी. गव्हाणे (लातूर), श्रीमती एस.एस. गायकवाड (लातूर), श्रीमती. ए.एन. सय्यद (लातूर), गिरीष कानाडे (लातूर), लिता कामखेडे (लातूर), तानाजी वाकूरे (उस्मानाबाद), रघुनाथ गोरे (उस्मानाबाद), एन.सी.बुळ्ळा (लातूर), बी.पी. देशमुख (लातूर), श्रीमती व्ही.एम. खानापूरे (लातूर), आश्विनी मैंदरकर (उस्मानाबाद), श्रीमती ए.एस.साळुंके (लातूर), श्रीमती. एम.एस. सोळुंके (लातूर), साहेलुजम्मा सय्यद (उस्मानाबाद), सुशिल ताकमोघे (उस्मानाबाद) यांचा सेवेत कायम केलेल्या प्राध्यापकांचा समावेश आहे.