जिल्हा बँकेच्या मतदानासाठी १९० संस्था अपात्र

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या कांही दिवसात होणार आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिका-यांनी सभासद संस्थांचे ठराव मागविले होते. प्राप्त झालेल्या १०४३ पैकी १९० ठराव अपात्र ठरले आहेत. निवडणूक अधिका-यांनी सोमवार दि. २ मार्च रोजी बँकेची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या दोन हजार ७४ संस्था सभासद आहेत. परंतू यातील अनेक संस्था अवसायनात निघाल्याने त्यांना कुलूप लागले आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानासाठी कोणाला अधिकार द्यायचा यासाठी ठराव मागविण्यात आले होते.
सहाय्यक निबंधकांमार्फत बँकेकडे १०४३ संस्थांचे ठराव प्राप्त झाले होते. त्यापैकी १९० ठराव बँकेने अपाक्ष ठरविले आहेत. पात्र ठरावानुसार बँकेची मतदार यादी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक विजयकुमार साहोत्रे यांनी सोमवारी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर कोणाचे आक्षेप असल्यास १२ मार्च पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार आहे. २३ मार्च रोजी आक्षेपावर निर्णय दिला जाणार आहे. २५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असली तरी राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी र्माेचे बांधणी सुरू केली आहे.
आपआपल्या पक्षाच्या कार्यकत्र्यांचे जास्तीत जास्त ठराव कसे घेता येतील याकडे लक्ष दिले आहे. सभासद संस्था दोन हजाराच्या आसपास असल्या तरी मतदानाचा अधिकार फक्त ८५३ सभासद संस्थेलाच आहे. मतदार संख्या कमी असल्याने बँकेची निवडणूक रंगतदार होणार आहे.