वडगाव औद्योगीक वसाहतीसाठी शासकीय दराप्रमाणे भाव देण्यात यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आदेश

उस्मानाबाद या तालुक्यातील वडगाव येथे औद्योगीक वसाहतीसाठी तेथील शेतकNयांनी ३६० एकर जमिन स्वखुशिने शासनास दिली असून या शेतकNयांना त्यांच्या जमिनीचा भाव शासकीय दराप्रमाणे देण्यात यावा असे आदेश राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाNयांना दिले.
या तालुक्यातील वडगाव येथील शेतकNयांनी तुळजापूर- धाराशिव महामार्गालगत असणारी ३६० एकर जमिन औद्योगीक वसाहतीसाठी शासनास स्वखुशिने देण्याबाबत संमती दिली आहे. या संदर्भात वडगाव सि. येथील शेतकNयाच्या शिष्टमंडळाने तुळजापूर येथे जावून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. व त्यांच्याशी चर्चाही केली.
या तालुक्यातील वडगाव सि. येथील शेतकNयांनी महाराष्ट्रा शासनास ३६० एकर जमिन औद्योगीक वसाहत उभारण्यास स्वखुशिने दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ९ ऑगस्ट २०११ रोजी अधिसूचनाही प्रसिध्द केली. त्याच प्रमाणे कलम ३२ (२) व कलम ३२ (१) नुसार अधिसूचना प्रसिध्द करुन त्याचे जाहिर प्रगटनही प्रसिध्द केले आहे. औद्योगीक वसाहतीसाठी जी जमिन देण्यात आली आहे. त्या जमिनीचे दर ठरविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व उद्योग खात्याचे संबंधित अधिकारी यांची बैठकही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संबंधित शेतकNयांनी औद्योगीक वसाहतीसाठी संपादीत केलेल्या जमिनीस प्रती एकर तीस लाख रु. मावेजा देण्याची मागणी केली. सध्या धुळे - सोलापूर या रस्त्याचे चौपदीकरणाचे काम सुरु असून त्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीस सुध्दा शासनाने एकरी २५ लाख प्रमाणे शेतकNयांना नुकसान भरपाई दिली आहे.
यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी संबंधित शेतकNयांचे म्हणने शांतपणे ऐवूâन घेतले. आम्हाला किमान शासकीय दराप्रमाणे तरी जमिनीस भाव मिळाला पाहिजे. यासाठी विनंती केली. शेवटी उद्योग मंत्र्यानी संबंधित खात्याच्या अधिकाNयांकडे याची विचारना केली. व त्यांना या शेतकNयांनी औद्योगीक वसाहतीसाठी स्वखुशीने जमिनी दिल्या आहेत. तेव्हा त्यांना शासकीय दराप्रमाणे भाव देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा सपंर्वâ प्रमुख गौरीष शानभाग, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील,  माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वडगावचे माजी सरपंच रमेश कोरडे, चंद्रकांत मुळे तसेच लातूर येथील एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी देशमुख हे उपस्थित होते.