शरद पवारांची आज तुळजापुरात जाहीर सभाउस्मानाबाद रिपोर्टर..: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची आज तुळजार येथील हाडको मैदानावर राष्ट्रवादीचे उमेदवार जिवनराव गोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपिस्थित रहावे असे अवाहन जिवनराव गोरे यांनी आज उस्मानाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.
तुळजापुर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिवनराव गोरे यांच्या प्रचारार्थ तुळजापुर येथील हडको मैदानावर आज रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजाता शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
या सभेसाठी सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सभेसाठी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन या सभेसाठी कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जिवनराव गोरे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी माजी आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आ. नरेंद्र बोरगावकर, गोकुळे शिंदे आदंीची प्रमुख उपस्थिती होती.