ईट : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत परंडा विधानसभा मतदार
संघातून राकाँचे राहुल मोटे १२ हजार ३७९ मताधिक्य घेऊन विजयी झाले. यामध्ये
स्वत:च्या ईट जि. प. सर्कलमधून त्यांना २ हजार ७८९ मतांची आघाडी मिळाली.
ईट जि. प. सर्कल मधील ईट व सुक्टा पं. स. गणातील १८ गावापैकी फक्त चार
गावामध्ये त्यांचे मताधिक्य घटले आहे. विशेष म्हणजे जि.प. सर्कल मधील ईट या
मोठय़ा गावात त्यांना कमी मतदान मिळाले आहे.
विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.यावेळी निवडणूक ही सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे चिन्ह दिसत होते. मात्र प्रत्यक्षात तिरंगी लढत झाली इतर उमेदवारांना त्याच्या अनामत रकमाही राखता आल्या नाहीत. राहुल मोटे यांनी यंदा आमदारकीची हॅट्ट्रीक साधली. ईट जि.प. सर्कल हा आ. मोटे यांच्या हक्काचा सर्कल आहे. यात ईट पं. स. गणात ईट, अंजनसोंडा, गिरवली, सोóोवाडी, चांदवड, डोकेवाडी, नागेवाडी ही सात गावे असून, या सातही गावातून आ.मोटे यांना ३ हजार ९६९ तर ज्ञानेश्वर पाटील यांना १ हजार ९२४ मते मिळाली असून, आ.मोटे यांनी ईट पं. स. गणातून २ हजार ४५ मतांची आघाडी घेतली आहे.
याच सर्कलमधील सुक्टा पं. स. गणात सुकटा, घाटनांदूर, इराचीवाडी, भवानवाडी, डुक्करवाडी, पाडोळी, मात्रेवाडी, सोनगिरी, भोनगिरी, रामकुंड, वाकवड ही गावे आहेत. यामध्ये राहुल मोटे यांना २४४७ तर ज्ञानेश्वर पाटील यांना १ हजार ७0३ मतदान मिळाले. मात्र या पं. स. मध्येही आ.मोटे यांना ७४४ मतांची आघाडी मिळाली आहे. ईट जि.प. सर्कलमधील ईट, नागेवाडी, डुक्करवाडी, भवानवाडी या चार गावामध्ये राकाँचे मतदान घटून पिछेहाट झाली. मात्र काँग्रेसचे उमेदवार अँड. नुरोद्दीन चौधरी यांना ईटमध्ये ९९१ एवढे लक्षवेधी मतदान मिळाले, हे विशेष.