पाटील पितापुत्रांनी धाराशिव कारखाना बंद पाडला : पाटील



उस्मानाबाद रिपोर्टर.. : धाराशिव कारखाना बंद पाडण्याचे पाप डॉ. पाटील पिता पुत्रांनी केले असल्याची घणाघाती आरोप धाराशिव कारखान्याचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आळणी येथे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत केला.
पुढे बोलताना सुरेश पाटील म्हणाले की, डॉ. पाटील व राणा पाटील हे विकास कामात घालत असलेले आडफ़ाट्याचा पाडाच वाचला. धाराशिव कारखाना उभारणीसाठी माझी मदत घेतली. परंतू या मदतीच्या पोटी त्यांनी शेतक-यांची पिळवणूक चालू केली यांना विरोध करणा-या कार्यकत्र्यांचे उस न्याचे नाही, त्यांचे बिले अडवण्याचे काम डॉ. पाटील व राणा पाटील यांनी चालु केल्यानंतर त्यांना मी विरोध केला असता त्यांनी माझ्यावरही अन्याय करण्यास सुरुवात केला. यावरुन हे दोघेजण जिल्याच्या कोणताही विकास करुन शकत नाही डॉ. पाटलांचा गुडघ्यात तर राणा पाटलांचा घोटया मेंदु आहे अशी सडकून टिकाहि त्यांनी केली.अशा वृत्तीच्या माणसाला जिल्हयातून हद्द पार करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकत्र्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थिीमध्ये प्रवेश केला.