मुख्यमंत्री देवेद्र फडनवीसच होणार सुत्राची माहीती

 रिपोर्टर....
मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली. देवेंद्र यांची अशी होईल निवड भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक २७ ऑक्टोबरला होईल आणि तीत फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात येईल.
एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील वा अनुमोदन देतील, असे सूत्रांनी सांगितले.
२८ तारखेला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची फडणवीस भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर २९ तारखेला त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होईल. ■ मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस वानखेडे स्टेडियम बुक केले असल्याचे सूूत्रांनी सांगितले आहे. या स्टेडियमची पाहणी करण्यासाठी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी गुरुवारी वानखेडे स्टेडियमला भेट दिल्याचे स्टेडियम प्रशासनाने सांगितले. स्टेडियममध्ये ३३ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था आहे. तसेच जास्तीत जास्त ३५ हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. देवेंद्र हे माझे सहकारी आहेत. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. मी आधीच स्पष्ट केले आहे की, मी दिल्लीत आनंदी आहे, मला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्निपदाबाबत आमच्या पक्षाची संसदीय समती, पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. मी मुख्यमंत्री व्हावे, अशी आमच्या पक्षातील काहींची भावना आहे. पण तो त्यांचा प्रश्न आहे. मी पक्षाच्या आदेशाचे पालन करीन.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री मुंबई : सरकार स्थापन करण्याला अखेर मुहूर्त सापडला असून, २७ ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणेची आता केवळ औपचारिकता उरली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नव्हेतर शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्‍चित झाले असून, मंत्रिपदे आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत उभय पक्षांत बोलणी सुरू आहे. शिवसेनेला नव्या युती सरकारमध्ये १२ मंत्रिपदे दिली जातील. शिवसेनेने गृह खात्यासह १४ मंत्रिपदांची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच असल्याचे चित्र दिसत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि रा.स्व. संघाने फडणवीस यांच्याच नावाला हिरवा कंदिल दाखवला असल्याने फडणवीस यांची निवड निश्‍चित समजली जात आहे. गुरुवारी 'लक्ष्मी'पूजनाच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी गडकरी यांची त्यांच्या वाड्यावर जाऊन भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते भाजपाच्या कार्यालयातही भेटले. या भेटीत गडकरींनी फडणवीस यांना 'शुभेच्छा' दिल्या, तर फडणवीस यांनी, मला तुमच्याप्रती नेहमीच आदर आहे.