तुळजापुरात १८ उमेदवारांची माघार


तुळजापूर रिपोर्टर.: तुळजापूर विधानसभा मतदार संघातील बुधवार दि. १ ऑक्टोंबर २०१४ रोजी २९ पैकी १६ इतक्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतले तर दि. ३० व १ या दोन दिवसात ३१ उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी.एस. घुगे यांनी दिली. बुधवार दि. १ ऑक्टोंबर रोजी महेंद्र भानुदास धुरगूडे, गणेश रामचंद्र सोनटक्के, महानंदा गजानन पैलवान, अशोक हरिदास जगदाळे, सत्यवान नागनाथ सुरवसे, विजय सुधाकर शिंगाडे, डॉ. गोविंद विश्वनाथ कोकाटे, अ‍ॅड. विजयकुमार दिनकर नकाते, नवनाथ दशरथ उपळेकर, बालाजी प्रभाकर पवार, संतोष बालाजी राठोड, कृष्णा देवानंद रोचकरी, संतोष ज्ञानोबा केंदळे, खतीब तन्वीर अली सय्यद अली, कानिफनाथ देवकुळे, नामदेव धर्मा राठोड या १६ उमेदवारांचा समावेश आहे. तर दि. ३० मंगळवारी अतुल नगनाथ जवान व सुचेता जीवनराव गोरे उमेदवारांचा समावेश आहे.