भाजपाचा मुख्यमंत्री कोन होणार गडकरी की फडनवीस

रिपोर्टर...मतदान
झालं आणि आता उत्सुकता आहे निकालाची. मतदानानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर केले. या सर्व सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. एकमेव म्हणजे टुडेज चाणक्यच्या सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपला 151 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण जर भाजपची सत्ता जरी आली तर मुख्यमंत्री कोण होणार ? यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ‘देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी देताच देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रकाशझोतात आलं. फडणवीस यांचं नाव येताच शिवसेनेनं लगोलग उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं. पण हाच वाद कायम राहिला आणि अखेरीस जागावाटपाच्या तिढा आणि मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली. युती तुटली जरी असली भाजपमध्ये मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरूच होती. एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तर नितीन गडकरी पुन्हा राज्यात परतील अशी चर्चाही रंगली. मात्र गडकरींनी आपण दिल्लीतच खुश आहोत असं सांगून मोकळे झाले. पण गडकरी हे संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतले नेते आहे. त्यामुळे संघाचा जर आदेश आला तर गडकरींचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येऊ शकतं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मर्जीतले नेते असल्याचं मानलं जातं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर फडणवीस यांनीच पुढची कमान सांभाळली. त्यामुळे आपोआप फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी वर्णी लागलं. त्यामुळेच फडणवीस आणि गडकरी दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार मानले जात आहे.