उस्मानाबाद,दि.15:
जिल्ह्यातील उमरगा,
तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा या चार विधानसभा मतदार संघात बुधवारी
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता सकाळी 7 ते सांयकाळी 6
वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. सकाळच्या सत्रात चारही विधानसभा मतदारसंघात
मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे
चित्र दिसले. दुपारच्या सत्रात काहीशी मंदावलेली गती सायंकाळच्या सत्रात वाढल्याचे
चित्र दिसत होते. जिल्ह्यात सरासरी 65.26 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक
यंत्रणेने कळविले आहे. उमरगा मतदारसंघात 57. 46 टक्के, तुळजापूर-69.98 टक्के,
उस्मानाबाद-66.62 टक्के आणि परंडा मतदारसंघात
65.92 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात मागील 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 64.97 टक्के
इतकी होती. यावेळेस मागील वर्षीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले. उमरगा मतदारसंघात 86 हजार 81 पुरुष मतदार
आणि 75 हजार 769 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तुळजापूर मतदारसंघात 1
लाख 26 हजार 514 पुरुष आणि 1 लाख 45 हजार 21
महिला मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबादेत 1 लाख 15 हजार 990 पुरुष आणि 1 लाख 18 हजार 10 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. परंडा येथे 1
लाख 6 हजार 604 पुरुष आणि 87 हजार 358 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. तुळजापूर
येथे 5 इतर मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, सकाळी 7 वाजता जिल्ह्यातील 1361 मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात
झाली. प्रथम येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यात आले. सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात
सरासरी 7.84 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
उमरगा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 13 हजार 903 पुरुष मतदार आणि 6 हजार
933 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तुळजापूर मतदारसंघात सकाळी 9
वाजेपर्यंत 12 हजार 407 पुरुष आणि 10 हजार 539 महिला मतदारांनी त्यांचा मतदानाचा
हक्क बजावला. उस्मानाबादेत सकाळी 9 पर्यंत 17 हजार 524 पुरुष आणि 13 हजार 652
महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. परंडा येथे या वेळेपर्यंत 12 हजार 676 पुरुष
आणि 8 हजार 964 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला.
सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी
18.36 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
उमरगा मतदारसंघात 30 हजार 503 पुरुष मतदार आणि 15 हजार 233 महिला मतदारांनी
आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तुळजापूर मतदारसंघात 39 हजार 273 पुरुष आणि 29
हजार 38 महिला मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबादेत 31 हजार 543
पुरुष आणि 24हजार 278 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. परंडा येथे या वेळेपर्यंत
31 हजार 863 पुरुष आणि 24 हजार 499 महिला
मतदारांनी आपला हक्क बजावला.
दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 35.85 टक्के मतदानाची नोंद झाली
होती. उमरगा मतदारसंघात 58 हजार 211 पुरुष मतदार आणि 48 हजार 868 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
होता. तुळजापूर मतदारसंघात 68 हजार 729 पुरुष आणि 48 हजार 474 महिला मतदारांनी
त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबादेत 61 हजार 762 पुरुष आणि 51 हजार 577
महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. परंडा येथे या वेळेपर्यंत 58 हजार 123 पुरुष
आणि 46 हजार 345 महिला मतदारांनी आपला
हक्क बजावला.
दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 49.36 टक्के मतदानाची नोंद झाली
होती. उमरगा मतदारसंघात 69 हजार 247 पुरुष मतदार आणि 62 हजार आठ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
होता. तुळजापूर मतदारसंघात 94 हजार 613 पुरुष आणि 74 हजार 301 महिला मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
उस्मानाबादेत 86 हजार 370 पुरुष आणि 75 हजार 283
महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. परंडा येथे या वेळेपर्यंत 81 हजार 521
पुरुष आणि 65 हजार 254 महिला मतदारांनी
आपला हक्क बजावला.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 59.62 टक्के मतदानाची नोंद झाली
होती. उमरगा मतदारसंघात 78 हजार 654 पुरुष मतदार आणि 71 हजार 73
महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तुळजापूर मतदारसंघात 1
लाख 17 हजार 588 पुरुष आणि 92 हजार 391 महिला मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
उस्मानाबादेत 1 लाख 5 हजार 841 पुरुष आणि 91 हजार 799 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला.
परंडा येथे या वेळेपर्यंत 97 हजार 364 पुरुष आणि 80 हजार 452 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला.
दरम्यान, उमरगा मतदारसंघात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडल्याचे निवडणूक
यंत्रणेकडून सांगण्यात आले. तुळजापूर येथे मतदान सुरु होण्यापूर्वी एका मतदान
यंत्रात बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ ते यंत्र बदलण्यात आले आणि मतदान
प्रक्रिया सुरु करण्यात आली. उस्मानाबाद मतदारसंघात मतदान केंद्र क्र. 183 आणि
क्र. 194 येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने ती बदलण्यात आली. परंडा मतदारसंघातही
केंद्र. क्र. 178, 292 आणि 305 येथे मतदान यंत्रांत तांत्रिक अडचण आल्याने ती
यंत्रे बदलण्यात आल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
निवडणूक मतदानाची प्रक्रिया
शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. या निवडणूकीसाठी चार मतदार संघात
100 पोलीस अधिकारी, 1 हजार 300 पोलीस कर्मचारी, 550 होमगार्डस आणि रेल्वे पोलीस,
पंजाब पोलीस आणि एसआरपी यांच्या पाच कंपन्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यात एकूण 12 लाख 33 हजार 52 मतदार असून
6 लाख 63 हजार 124 पुरुष, 5 लाख 69 हजार 913 स्त्री आणि इतर 15 मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघात 2 लाख 81
हजार 687
मतदार असून त्यामध्ये 1 लाख 50
हजार 925 पुरुष मतदार तर 1 लाख 30 हजार 758 स्त्री मतदारांची
संख्या आहे. शिवाय इतर 4 मतदार आहेत.
उमरगा विधानसभा मतदार संघात 301 मतदान केंद्र होते. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 30
हजार 165
मतदार असून त्यामध्ये 1 लाख 78
हजार 523
पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 635 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 7 मतदार आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 370
मतदान केंद्र होती. उस्मानाबाद विधानसभा संघात 3 लाख 26 हजार 942
मतदार असून त्यामध्ये 1 लाख 75
हजार 240
पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 699 स्त्री मतदारांची संख्या आह. शिवाय इतर 3 मतदार आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 347 मतदान केंद्र होती. परंडा विधानसभा संघात 2 लाख 94 हजार 258
मतदार असून त्यामध्ये 1 लाख 58
हजार 436
पुरुष मतदार तर 1 लाख 35 हजार 821 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 1 मतदार आहेत.
परंडा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र होती. ****