परंड्यातून ३५ जणांचे ३८ अर्ज दाखल


भूम रिपोर्टर  : परंडा विधानसभा मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारसंघातून ३५ उमेदवारांनी आपले ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले.
परंडा विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी कडून आ. राहुल मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांनी आपले भव्य शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शेवटच्या दिवशी ३५ उमेदवारांनी ३८ अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये वैशालीताई मोटे, राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, कुकरे राजाभाऊ, अहिरे प्रबुद्ध, गणेश शेंडगे, नुरुद्दीन चौधरी, हावरे करिम, सुरेश कांबळे, अमेय पाटील, कुमलाकर खैरे, बाळासाहेब पाटील, गोरख खैरे यांनी आखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असुन ३५ उमेदवारांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक अधिकारी यांनी दिली.