तुळजापूरातुन सुधीर पाटील यांची उमेदवारी दाखल


उस्मानाबाद रिपोर्टर  : तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधिर पाटील यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ही उमेदवारी दाखल करताना सौ. विमलताई बडवे, उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, तालुका प्रमुख तुळजापूर पठाण राजअहमद, शहर प्रमुख सुधिर कदम, जि. प. सदस्या उस्मानाबाद सुषमाताई देशमुख, बाळकृष्ण घोडके, सुनिल जाधव, मगर प्रदिप, भोसले संजिव, मोरे कृष्णा, मुरलीधर शिनगारे, ठाकूर सरदारसिंग, पुदाले संतोष तसेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.