नवोदय विदयालयात जिल्हाधिकारी डॉ.नारवरे यांची मतदान जनजागृती रॅली आणि स्वच्छता अभियान        उस्मानाबाद,दि.29: मतदान करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आणि हक्क आहे. हा हक्क प्रत्येकाने निर्भयपणे बजावला  पाहिजे. भारतीय घटनेने मतदारांना मतदान करण्याचा अमुल्य अधिकार दिला आहे. तेव्हा प्रत्येकानी मतदानाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
           तुळजापूर येथील नवोदय विदयालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती   अभियानानिमीत्त मतदार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ डॉ. नारनवरे यांनी हिरवी झेंडी दाखवनू प्रारंभ केला.
            जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, उमेदवार निवडण्याचा माझा अधिकार नसून ती  माझी राष्टरीय जबाबदारी आहे. विधानसभा मतदार  संघात मतदारात मतदानाविषयी जनजागृती करावी व  निर्भयपणे व कोणाच्या ही दबावास व अमिशाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असे आवाहन केले.
           यावेळी  नवोदय विदयालयातील प्राचार्य,‍ प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थ्यांना मतदान करण्या  विषयी शपथ दिली. त्यानंतर ‍ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत   नारनवरे यांच्यासह विदयालयातील्‍  ‍ शिक्षक, विदयार्थ्यानी विदयालय ‍ परीसर स्वच्छता केली.    
     माजी सैनिकांना पदभरतीबाबत आवाहन
            उस्मानाबाद,दि.29-माजी सैनिकांना सूचित करण्यात येते की, व्यवसाय शिक्षण संचालनालयातंर्गत शासकीय संस्था / कार्यालयातील गट () अराजत्रीत व गट क मधील रिक्‍त पद भरती होणार आहे. यात वरीष्ठ लिपीक- कनिष्ठ लिपीक, सहा. भांडारपाल/ भांडार लिपीक, वाहन चालक आदिपिदाची भरती पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वरील पदासाठी www.vet.gov.in  या संकेतस्थळावर  ऑनलाईनवर आपला  अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत विहीत नमुन्यात  भरून  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.        

फटाका विक्री स्टॉल परवान्यासाठी 13 ऑक्टोबरपर्यंr
                                अर्ज करण्याचे आवाहन
         उस्मानाबाद,दि.29-प्रतीवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगीसाठीचे अर्ज 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज फॉर्म एलई-5, ओळखपत्र संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र, व सांक्षाकीत नकाशा, संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकाचे नाहरकत व जागेचे कागदपत्र, संबंधित पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र,  विहीत परवाना फीस भरणा केल्याचे चलन सादर करावे. परिपूर्ण असलेले प्रस्ताव या कार्यालयात स्वीकारण्यात येतील तसेच विहीत दिनांकानंतर  व उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.        *****