तुळजापुर मतदार संघामध्ये अशोक जगदाळे यांना चांगली पसंती



नळदुर्ग रिपोर्टर. उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक जगदाळे यांनी तुळजापूर​ विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणुन निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी गावोगावी पुन्हा संपर्क वाढवला आहे. अशोक जगदाळे यांनी गेल्या महिन्यात प्रवेश केला होता. मात्र पक्षांने त्यांना डावलून संजय निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज जगदाळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी या मतदार संघात संपर्क वाढविला आहे. त्यामुळे तुळजापूर मतदार संघात चुरस वाढली आहे. एकदरित सगळी परिस्थिती पाहता ​अशोक जगदाळे हे सामाजिक कार्यमध्ये अग्रेसर असल्याने तुळजापूर मतदार संघातून जनतेची चांगली पसंती जगदाळे यांना आहे.