उस्मानाबाद विधाानसभा मतदारसंघातून २४ जणांचे ३६ अर्ज दाखल




रिपोर्टर

: विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दि. २७ रोजी शेवटचा दिवस होता. या शेवटच्या म्हणजेच सातव्या दिवशी उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात २४ उमेदवारांनी ३६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर आज पर्यंत या मतदारसंघातून ३९ जणांनी ५९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून काँंग्रसकडून विश्वास शिंदे, स्मिता शहापूरकर यांनी राष्ट्रवादीकडून अर्चना राणा पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी, भाजपाकडून संजय त्र्यंबक दुधगावकर व चारुशिला संजय दुधगावकर (पाटील) यांनी, मनसेकडून संजय यादव यांनी, बसपाकडून संजय वाघमारे, धनंजय पाटील हिंदूस्थान निर्माण दल, अनिल हजारे, रिपब्लिकन सेना, वाजीद शेख, अपक्ष, हजीभाई हुमरे अपक्ष, रमेश बनसोडे रिपाई, चव्हाण बाबू यांनी हिंदूस्थान जनता पार्टी कडून, उमेश भालेराव बहुजन मुक्ती पार्टीकडून व पठाण अकबरखान गुलाबखान यांनी एमआयएमकडून, शिवाजी कापसे यांनी अपक्ष म्हणुन, मधुकर गायकवाड यांनी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया कडून, अनंत चोंदे यांनी शेकापकडून तर पिंटू पांडूरंग चांदणे यांनी अपक्ष म्हणुन पांडूरंग भोसले यांनी अपक्ष म्हणुन प्रदिप जाधव यांनी अपक्ष म्हणुन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या म्हणजे सातव्या दिवसापर्यंत ३९ उमेदवारांनी ५९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.