आमच्या १७४ उमेदवारांची तयारी पूर्ण : हर्षवर्धन पाटील----उर्वरित ११४ मतदारसंघाचीही चाचपणी


  रिपोर्टर..

उस्मानाबाद : अवघ्या कांही दिवसावर येवून ठेपलेल्या विधानसभेच्या पाश्र्वभुमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षामध्ये अलबेला असल्याचे दिसुन येत आहे. महायुती ही तुटण्याच्या मार्गावर असताना मागच्या १५ वर्षापासुन अस्तित्वात असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीतही तणाव असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने आपल्या वाट्याला असणा-या १७४ उमेदवारांची तयारी पुर्ण केले असल्याचे सांगताना सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उर्वरीत ११४ मतदारदार संघाच्या जागेची चाचपणी सुरु असल्याचे सांगुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. ते आज तुळजापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
राज्यात कांही दिवसांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरु असल्याचे पाहयला मिळत आहे. जागा वाटपावरुन शिवसेना-भाजपाची युती तुटण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये जागा वाटपावरुन चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले.राष्ट्रवादीकडून यावेळी १४४ जागा लढविण्याची मागणी होत आहे. मात्र काँग्रेस १२४ च्या वर एकही जागा देण्यास तयार नाही. यासंंबंधी बोलताना आज सहकार मंत्री तथा काँग्रेसच्या मिडिया कमेटीचे प्रमुख हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीचा निर्णय हा दिल्ली स्तरावर होणार असल्याचे सांगीतले. तसेच आघाडी होवो अथवा न होवो काँग्रेसने आपली तयारी पुर्ण केली असुन १७४ उमेदवारांची तयारी ही पुर्ण झाली आहे. तसेच आघाडी न झाल्यास उर्वरीत ११४ मतदार संघातल्या उमेदवारांची चाचपणीला ही सुरुवात झाली आहे.
दोन्ही काँग्रेसमधील कार्यकत्र्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्यानुसार कार्यकत्र्यांना काम करावे लागणार असुन दोन्ही पक्षांनी मागच्या पंधरा वर्षापासुन एकत्र काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. अद्याप जागा वाटपाचा निर्णय न झाल्याने येत्या कांही दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.
तसेच काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीतील आगामी रणनिती विषयी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष ही निवडणुक विकासाच्या मुद्द्यावर लढणार असुन काँग्रेसने मागच्या वर्षात मोठी विकासकामे केलेली आहेत. तसेच जी कामे अपुर्ण आहेत. ती कामे पुर्ण करण्यात येणार आहे. तरुण वर्गासाठी शैक्षणिक, औद्योगिक, व्यवसायीक यासाठी मोठ्या सुविधा तसेच महिला सबलीकरण, शेतक-यांसाठी विविध योजना तसेच आरोग्य व सामाजिक न्याय या प्रमुख पाच मुद्द्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.