राष्ट्रवादीच्या जागा वाटपात प्रश्न गंभीर

रिपोर्ट​र : विधानसभेचं बिगुल वाजलंय मात्र अजूनही आघाडीत जागावाटपाचा घोळ सुटण्याची चिन्हं दिसत नाहीये.  राष्ट्रवादीने जागावाटपाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय. जागावाटपाची चर्चा सुरू आहे, पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील अशी माहितीही त्यांनी दिली.
तर माणिकरावांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीनेही सडोतोड उत्तर दिलय .कॉंग्रेसने मोठ्या भावाप्रमाणे वागावे वस्तुस्थिती लक्षात घेऊन चर्चेला प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय. एकीकडे कालच आचारसंहिता लागू झाली असतानाच आता जागावाटपासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये बैठकांनी जोर पकडलाय . पण त्याचबरोबर दोन्ही पक्ष एकमेकांना चिमटे काढणं सोडत नाहीयेत. सगळीकडे राष्ट्रवादीने एकच आखाडा धरुन राहू नये, प्रेस्टीज इश्यू करु नये असा इशाराच माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.