आघाडीचे जागा वाटपा बाबत भिजत घोंगड.

.रिपोर्टर..गेल्या महिन्याभरा
पासून जागावाटपावरून आघाडीत बिघाडी झाली. जागावाटपाच्या खेचाखेचीनंतर आघाडीची गाडी आता हळुहळू रूळावर येताना दिसत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला आणखी 4 ते 6 जागा वाढवून देऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत दोन्ही पक्षांची बैठक होणार आहे.
महिनाभराच्या रस्सीखेचानंतर आघाडीचे नेते एकत्र चर्चेसाठी येणार आहे.उद्या मुंबईत जागावाटपावर बैठक होणार आहे. याबैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीपुढे हा नवा प्रस्ताव ठेवणार आहे. या प्रस्तावात काँग्रेस राष्ट्रवादीला 4 ते 6 जागा वाढवून देणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. पण काँग्रेस राष्ट्रवादीला 128 ते 130 पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. दुसरीकडे त्याचवेळी काँग्रेसने दबावतंत्राचा एक भाग म्हणून सर्वच्या सर्व 288 जागांची तयारी चालवलीय. दिल्लीत आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली.या बैठकीत 288 जागांवर चर्चा झाली. आघाडीबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं या बैठकीत ठरलं. या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी एक बैठक झाली. त्या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते. दरम्यान,
आज राष्ट्रवादीने आज आपला संयम सोडत चर्चेसाठी तयारी दर्शवली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्याला फोन केला होता आणि जागावाटपावर चर्चा केली होती. आज सकाळीही त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली त्यानुसार आम्ही उद्या सकाळी 10 वाजता समोरासमोर चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना दिली. आघाडी कायम राहावी अशी राष्ट्रवादीची भावना आहे. पण काँग्रेसने दिलेला 124 जागांचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे. आमची भूमिका ठाम असून जागावाटपाच्या घोळातून मार्ग निघावा अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली.