तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ६९ अर्जतुळजापूर रिपोर्टर  : उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने आज उमेदवारी अर्ज भरणा-यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले. आज अखेरच्या दिवसापर्यंत ३६ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात इच्छुकांची भलीमोठी गर्दी पाहयला मिळाली. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांची अर्ज भरण्यासाठी धावपळ उडाली. आज शेवटच्या दिवशी जवळपास २८ उमेदवारांनी ४८ अर्ज सादर केले.
यामध्ये संजय सुरेश रेणुके (अपक्ष), किरण भगवानराव जाधव (अपक्ष), राहुल नागनाथ जवान व अतुल नागनाथ जवान (हिंंदूस्थान जनता पार्टी), सुधीर केशव पाटील (शिवसेना), सौ. महानंदा गजानन पैलवान (दोन अर्ज), पिंटू पांडूरंग चांदणे (दोन अर्ज) अपक्ष, गणेश रामचंद्र सोनटक्के (दोन अर्ज) अपक्ष, वर्षा संजय निंबाळकर (चार अर्ज), संजय प्रकाश निंबाळकर (दोन अर्ज)भाजप, बालाजी प्रभाकर पवार (अपक्ष), देवानंद साहेबराव रोचकरी (दोन अर्ज) शे.का.प. व म.न.से, जीवनराव विश्वनाथराव गोरे (चार अर्ज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सचिता जीवनराव गोरे (दोन अर्ज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सत्यवान नागनाथ सुरवसे (दोन अर्ज) भाजप, प्रेमानंद बळवंतराव डोरनाळीकर (दोन अर्ज) बसपा, रामेश्वर धोंडिबा शेटे (चार अर्ज), कृष्णा देवानंद रोचकरी (शे.का.प.), खतीब तन्वरअली सय्यदअली (अपक्ष), महेंद्र भानुदास धुरगुडे (अपक्ष), संतोष ज्ञानोबा कंदले (अपक्ष), कानिफनाथ दुल्हा देवकुळे (दोन अर्ज), विजय सुधाकर शिंगाडे (दोन अर्ज), रमेश राजाराम निंबाळकर व मोहन वर्षल लोंढे या उमेदवारांच्या अर्जाचा समावेश असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी.एस.घुगे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज भरतेवेळी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी के.एच. पाटील, राजकुमार माने, नायब तहसीलदार (निवडणुक) एन.एस. भोसीकर व निवडणुक कर्मचारी उपस्थित होते.