उस्मानाबादमध्ये होणार तिरंगी लढत


रिपोर्टर लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदारसंघातुन तिरंगी लढत होणार असून या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विदयामान खासदार डॉ.पदमसिंह पाटील,आपक्ष उमेदवार लोकमंगल समुहाचे रोहन देशमुख तर सेनेचे रवि गायकवाड या तिन उमेदवारामध्ये ही लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत.त्यामुळे निवडून कोन येणार या बाबत कसल्याही प्रकारचे आंदाज बांधंता येने कठीन आहे.परंतु गेल्या लोकसभेला रवि गायकवाड हे 6000 हाजार मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते त्यामुळे यावेळी सेनेच्या पधादीका—यांडुन गायकवाड यांना तिकीट देण्यासाठी विरोध होत होता. यावरून  सेनेमध्ये गटबाजी निर्मान झाल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.रोहन देशमुख यांनी लावलेली तगडी फिल्डीग पहाता सध्यांतरी ही निवडनुक सेनेच्या उमेदवारालाच जड जाण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर राष्ट्रवादी पक्षानेही त्याच्या प्रचाराच्या धुरा बदलल्या आहेत.सर्व ताकतीने रिंगनात उतरलेल्या राष्ट्रवादीने आपला विजय पक्का आहे. आदिच ठरवुन ठेवले आहे.देशाच्या राजकारणात मोदी फॅक्टर चालु आसल्याने सध्याची युवा पिढी ही मोठया संख्येने भाजपाकडे आकर्षीत होताना दिसत आहे.परंतु उस्मानाबादच्या राजकीय उलाढालीमध्ये आनेकवेळा आसे बदलाचे वारे येवुन गेले आहे.त्यामुळे उस्मानाबादकरांना हा अनुभव नवा नाही.त्यामुळे या तिरंगी वा—यात कोन उडून जाणर आणि कोन राहानार या कडे सगळयंचे लक्ष लागले आहे.