सेनेकडून दोन लोकसभा जागेसाठी उमेदवार जाहीर..

.रिपोर्टर..
शिवसेनेनं आणखी दोन उमेदवारांची केली नावं जाहीर केलीय. उस्मानाबादमधून सध्याचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचा पत्ता कट करत रवी गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिकमधून हेमंत गोडसेंना रिंगणात उतरवलंय. रवी गायकवाड उस्मानबादमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात थोड्या मतांनी पराभुत झाले होते.तर नाशिकमधुन उमेदवारी मिळालेले हेमंत गोडसे गेल्या वेळी मनसे कडुन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते.पण राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्या विरोधात अगदी थोड्या मतांनी पराभुत झाले होते.
जिल्हापरिषद सदस्य असलेल्या हेमंत गोडसेंचा मनसेचा उमेदवार म्हणून अगदी नवखा चेहरा होता तरीही समीर भुजबळ सारख्या बलाढ्य उमेदवाराविरोधात कडवी लढत देत बाविस हजार मतांनी दुसर्‍या क्रमांकावर होते.सहा महिन्यांपुर्वी मनसेच्या एकाधिकारशाही विरोधात बंड करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.