शिवजयंतीनिमित्त राष्टवादीतपर्फे सोमवारी रक्तदान ​महाशिबीर


उस्मानाबाद.रिपोर्टर.. छत्रपती ​शिवाजी महाराजांच्या 384 जयंतीनिमित्त राष्टवादी कॉंग्रेसच्या वतीने दि.03 मार्च रोजी येथील राष्टवादी भवनमध्ये रक्तदान महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 384 व्या जयंतीनिमित्त हे शिबीर घेण्यात येत असल्याने शिबीरात 384 रक्तदात्यांचेच रक्तदान घेण्यात येणार असून, नोंदणी क्रमांकानुसारच रक्तदान स्वीकारण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. दरम्यान,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री पुरूष, जात धर्म असा कसलाही भेदभाव न ठेवता सर्वांना एकत्रित करून महाराष्ट धर्म वा​ढविला. याचाचा आदर्श समोर ठेवून माणसामाणसातील माणुसकीचे नाते अधिक व्रध्दींगत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आयोजीत या उपक्रमात मोठया संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवहान आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.