महायुतीची दुसरी सभा बीडमध्ये

 रिपोर्टर.. महायुतीची दुसरी सभा बीडमध्ये झाली. पहिल्या सभेप्रमाणेचं बीडमधल्या सभेलाही मोठी गर्दी झाली होती.
या सभेत महायुतीच्या सर्व नेत्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढवला. बीडमध्ये राष्ट्रवादीला अजून उमेदवार सापडत नाही, असं म्हणत गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना आव्हान दिलं.
तर महायुतीचे पाच पांडव मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता पडतील, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला गाडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.