लोहारा येथिल गोदाम पालास सक्तमजूरी..

रिपोर्टर....
याबाबत सहाय्यक सरकारी वकील व्ही.एस.आळंगे यांनी सांगितले की, लोहारा तालुक्यातील चिंचोली (रेबे)येथील अरविंद व्यंकटराव पाटील हे त्यांच्या पत्नी निर्मलाबाई अरविंद पाटील यांच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे व्यवहार पाहत होते.त्यांना डिसेंबर २0१0 या महिन्यात धान्य वाटप करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांद्वारे ३४क्विंटल गहू व २१क्विंटल तांदूळ असे एकूण ५५क्विंटल धान्य मंजूर झाले होते.हे धान्य गोदामामधून पुरवठा करण्यासाठी लोहारा तहसील कार्यालयातील गोदामपाल तुकाराम काशिनाथ कोळी यांनी अरविंद पाटील यांच्याकडे ७डिसेंबर रोजी तीनशे रूपये लाचेची मागणी केली होती.
याबाबत अरविंद पाटील यांनी ८डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.यानुसार याच दिवशी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला.यावेळी पंच अशोक वाघमारे यांच्यासमक्षलोहारा तहसील कार्यालयातील गोदामामध्ये तीनशे रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पथकाने तुकाराम कोळी यास अटक केली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३(१) (ड) सह १३(२)अन्वये गुन्हा दाखल दाखल झाला होता.
सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आलेल्या साक्षी, पुरावे गृहित धरून उमरगा येथील विशेष न्यायाधीश स.ला.पठाण यांनी आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७प्रमाणे एक वर्षसक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड व दंड न दिल्यास एक महिना सक्त मजुरी.तसेच कलम १३(१) (ड)सह १३(२)प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रूपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.(वार्ताहर)
या प्रकरणाच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, पंच साक्षीदार अशोक वाघमारे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड व तपासीक अंमलदार एफ.सी.राठोड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.यावरून कोळी याने तीनशे रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याचे सिध्द झाल्याचे अँड.आळंगे म्हणाले. उमरगा : /शासनाच्या योजनांद्वारे मंजूर झालेले धान्य रेशन दुकानास पुरवठा करण्यासाठी तीनशे रूपयांची लाच घेतल्याचा आरोप सिध्द झाल्याने लोहारा येथील गोदामपाल तुकाराम कोळी यास उमरगा न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.