रिपोर्टर..
उस्मानाबाद : महिला याच कुटूंबाचा कणा असतात. मात्र घरातील कामाच्या व्यापामुळे बहुतांश वेळा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हा प्रकार सातत्याने सुरू राहिल्यास त्यांना गंभिर आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उमरगा तालुक्यातील विविध ठिकाणी खास महिलांसाठी आरोग्य शिबीर दि. ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आले. या शिबीरात ४५७८ बालक, युवती व महिलांची तपासणी करण्यात आली.
तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मागील अनेक वर्षापासून जिल्हाभरात आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगानेच बेडगा येथे हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणीसाठी खास मुंबईहून तज्ञ डॉक्टरांचे पथक पाचारण करण्यात आले होते. सलग पाच दिवस चाललेल्या या शिबीरात खामसवाडीख, अंबेजवळगा, कोंड, आलूर, बेडगासह परिसरातील वाड्या, वस्त्यांवरील महिलांनी हजेरी लावली. डॉ. शैलेश माने, डॉ. ध्वनी मेहता, डॉ. सुर्यकांत सावंत, डॉ. सतिश तांदळे, डॉ. आशिष सिर्के आदिंनी तपासणी केली. बेडगा येथे झालेल्या शिबीरात ८२५ शिबीरार्थींची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
या उपक्रमाप्रसंगी तेरणा ट्रस्टचे विश्वस्त विजेंद्र चव्हाण, अमरसिंह देशमुख, पं. स. उपसभापती दत्तात्रय देवळालकर, जि. प. सदस्य द्रोपदी खांडेकर, इमामबी शहादत्त शेख, राजेसाहेब देशमुख, प्रा. दत्ता इंगळे, राजकुमार माने तर बेडगा शिबीराच्या समारोपप्रसंगी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे संचालक सुनिल माने, उपसरपंच केरनाथ चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रशांत कोल्हे यांनी प्रास्ताविक केले.