उस्मानाबाद रिपोर्टर..: राज्यातील औद्योगिक वीजदर अन्य राज्याच्या तुलनेने दिडपट तर
शेतक-यांचे वीजदर देशात तिस-या क्रमांकावर आहेत. केवळ कार्यक्षमता व
इच्छाशक्तीच्या आधारावर हे दर ३० ते ३५ टक्के कमी करणे शक्य आहे. ऊर्जा
मंत्री अजीत पवार यांच्या निष्क्रिय व अकार्यक्षमतेमुळे राज्यातील ऊर्जा
खात्याचा खेळखंडोबा झाला आहे. कृषी पंप धारकांना अव्वाचेसव्वा वीजबीले
दिल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतक-यांची हलाकीची
परिस्थती पाहून महाराष्ट्रातील शेतक-यांना मोफत वीज पुरवठा करण्याची मागणी
जनता दल ( से ) चे प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले यांनी समर्थ
फंक्शन हॉलमध्ये आयोजित केलेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात केली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक जनता दलाचे सरचिटणीस माधवसिंग राजपुत यांनी केले आहे. या वीज ग्राहकांच्या मेळाव्यासाठी वीज तज्ञ प्रताप होगाडे, राजन मुठाणे, डॉ. बशारत अहमद, जिल्हाध्यक्ष शाहुराज खोसे, नानासाहेब चव्हाण, राम देशमुख, अफजल काझी, गफर धुरगुडे, फिरोजखाँ पठाण, अॅड. किरण बावळे, उस्मान तांबोळी, युवराज नळे, गणेश देशमुख, वाय.आर. पाटील आदिंसह जनता दल कार्यकर्ते व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रामाचे सूत्रसंचलन रफिक पठाण यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. गणेश देशमुख यांनी केले.